बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

१०० रुपये....

वेळ दुपारचे २.०० आज सकाळी उठून डब्बा करण्याचा कंटाळा आला आणि ऑफिस मधल्या जेवण्याचा हि कंटाळा आला होता. ऑफिस च्या बाहेर एक छोटासा धाबा असल्यासारखे हॉटेल आहे..तिथे आम्ही आमचा जेवण्याचा आमचा कार्यक्रम आखला.. वेटर ला ओर्डर देऊन आम्ही गप्पा मारत बसलो..धाबा तसा खूप जोरात चालणारा.. ऑफिस च्या सुनसान परिसरात एकमेव बाहेरचा धाबा आणि glosory shop.. त्यामुळे धाब्यावर गर्दी तशी बरीच.. थोड्यावेळात एक BMW तिथे आली. माणूस जगात कधीच समाधानी नसतो..पहिले एक तरी चार चकी पाहिजे..मग कुठली का असेना.. मग ती मिळाल्यावर त्यातही lavish अशी BMW पाहिजे. आपणही VISTA वरून BMW वर कधी switch होऊ ..मनात स्वप्नांचा कल्लोळ उठलेला असताना एक शाळकरी मुलगी BMW मधून उतरली ..त्या मुलीला चोक्लेट्स घ्यायचे होते.. तिने दुकानदारासमोर १००० ची नोट पुढे केली.५ रुपयांच्या चोक्लेट्स साठी १००० रुपये .दुकानदार गोड शब्दामधून शिव्या देत होता :) मुलीने कार मध्ये बसलेल्या तिच्या वडिलांना पैसे मागितले. त्यांनीही सुटते नाहीत असे सांगितले.. त्यांना बघून मला आफ्रिकेतल्या डॉन ची आठवण झाली. भरगच्च सोन्याने मढलेला तो माणूस.. त्याच्या गळ्यातली साखळी ..माझ्या घरात असलेल्या कपडे वळत घालण्याच्या दोरीपेक्षा ही कितीतरी जास्त जाड होती :) दोघांनी त्यांच्या ड्रायवर कडून इकडून तिकडून चिल्लर मिळवले..आणि गाडी निघून गेली.. नन्तर एक सरकारी गाडी तिथे आली...त्यातील इसमाने ७० रुपयाचे सिगारेट चे पाकीट ऑडर केले.. दुकानदाराने पुन्हा राहिलेल्या चिल्लर पैस्यासाठी गोड शिव्या द्यायला सुरुवात केली..." Not a big problem..keep the change" म्हणून तो इसम निघून गेला... रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक इसम त्याच्या लहान मुलाला घेऊन सायकल वरून जात होता. त्याच्या सायकल चे पायडल तुटले होते.. जवळच असलेल्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळ तो इसम आला.. आणि "पायडल ठीक करण्यासाठी किती पैसे लागतील ?" त्याने एकदम व्याकुलातीने विचारले.."३० रुपये.." असा आवाज ऐकल्यावर क्षणार्धात त्याच्या मुलाचा चेहरा पडला..."बाबा, आज रात्री आपण चिकन नाही खाऊ शकणार ?" त्याच्या बाबांकडे प्रश्नांचे उत्तर नव्हते.. महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याच्या बाबांनी चिकन साठी जोडून ठेवलेले १०० रुपये पण सायकल ने त्यांच्या आनंदावर पाणी फिरवले होते . धाब्याचा बाजूला एक अशक्त माणूस पडलेला दिसला.लगबगीने त्याची एक छोटी मुलगी दुकानात आली आणि ४ रुपयाचा ब्रेड द्या असे म्हणू लागली.दुकानदार मुलीवर नाही म्हणून जोरात ओरडला. दयेपोटी मी न राहवून मुलीला ब्रेड विकत घेऊन दिला...मुलगी रडायला लागली.."माझे वडील भिकारी आहेत..दोन दिवसांपूर्वी मी आजारी पडले.. जवळ असलेल्या पैस्यातून त्यांनी माझासाठी औषधे आणली ..पण एक औषध ६० रुपयाचे होते...म्हणून वडील शनी मंदिराजवळ भिक मागायला गेले.. ते काल रात्री घरी परतले नाहीत.. आणि आज ते मला इथे अशा अवस्थेत भेटले ". शनी मंदिर आमच्या ऑफिस पासून १५ कि .मी. आहे..पोटात काहीही नसताना आमच्या ऑफिस पासून शनी मंदिर चा प्रवास.. विचार करूनही अंगावर काटा आला.. आज अशा गोष्टी का घडत होत्या माझा सोबत ? आयुष्य किती सहज , सोपं ,सुरळीत चाललं होत माझं.. संध्याकाळी घरी जाऊन कामवाली बाई येईल कि नाही..? माझी salary केव्हा वाढेल? घरामध्ये फुल फर्निचर केव्हा होईल.? या appriasal मध्ये ratings चांगली का नाही मिळाली? माझासाठी फक्त हेच प्रश्न होते.पण आज आयुष्य खूप वेगळ्या दृष्टीकोनातून बघावयास मिळाल. किंवा खूप जवळून म्हणा. गोष्ट १०० च रुपयांची.. पण प्रत्येकासाठी त्या १०० रुपयांचा किती वेगळा अर्थ होता.. कुणला त्याची गरजही नव्हती.. तर कुणासाठी तेच १०० रुपये म्हणजे सर्वस्व्स होते..त्या लहान मुलीचा आणि तिच्या वडिलांचा केविलवाणा चेहरा बघून माझे मन एकदम कळवळून गेले..माझाजवालाचे १०० रुपये काढून मी तिला दिले..मुलगी नको म्हणाली..वडिलांची शपथ दिल्यावर मुलीने पैसे घेतले. इतक्यात वेटर ने आवाज दिला ..म्याडम जेवण तयार आहे .१०० रुपये द्या. पुन्हा १०० रुपये...