बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

१०० रुपये....

वेळ दुपारचे २.०० आज सकाळी उठून डब्बा करण्याचा कंटाळा आला आणि ऑफिस मधल्या जेवण्याचा हि कंटाळा आला होता. ऑफिस च्या बाहेर एक छोटासा धाबा असल्यासारखे हॉटेल आहे..तिथे आम्ही आमचा जेवण्याचा आमचा कार्यक्रम आखला.. वेटर ला ओर्डर देऊन आम्ही गप्पा मारत बसलो..धाबा तसा खूप जोरात चालणारा.. ऑफिस च्या सुनसान परिसरात एकमेव बाहेरचा धाबा आणि glosory shop.. त्यामुळे धाब्यावर गर्दी तशी बरीच.. थोड्यावेळात एक BMW तिथे आली. माणूस जगात कधीच समाधानी नसतो..पहिले एक तरी चार चकी पाहिजे..मग कुठली का असेना.. मग ती मिळाल्यावर त्यातही lavish अशी BMW पाहिजे. आपणही VISTA वरून BMW वर कधी switch होऊ ..मनात स्वप्नांचा कल्लोळ उठलेला असताना एक शाळकरी मुलगी BMW मधून उतरली ..त्या मुलीला चोक्लेट्स घ्यायचे होते.. तिने दुकानदारासमोर १००० ची नोट पुढे केली.५ रुपयांच्या चोक्लेट्स साठी १००० रुपये .दुकानदार गोड शब्दामधून शिव्या देत होता :) मुलीने कार मध्ये बसलेल्या तिच्या वडिलांना पैसे मागितले. त्यांनीही सुटते नाहीत असे सांगितले.. त्यांना बघून मला आफ्रिकेतल्या डॉन ची आठवण झाली. भरगच्च सोन्याने मढलेला तो माणूस.. त्याच्या गळ्यातली साखळी ..माझ्या घरात असलेल्या कपडे वळत घालण्याच्या दोरीपेक्षा ही कितीतरी जास्त जाड होती :) दोघांनी त्यांच्या ड्रायवर कडून इकडून तिकडून चिल्लर मिळवले..आणि गाडी निघून गेली.. नन्तर एक सरकारी गाडी तिथे आली...त्यातील इसमाने ७० रुपयाचे सिगारेट चे पाकीट ऑडर केले.. दुकानदाराने पुन्हा राहिलेल्या चिल्लर पैस्यासाठी गोड शिव्या द्यायला सुरुवात केली..." Not a big problem..keep the change" म्हणून तो इसम निघून गेला... रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक इसम त्याच्या लहान मुलाला घेऊन सायकल वरून जात होता. त्याच्या सायकल चे पायडल तुटले होते.. जवळच असलेल्या सायकल दुरुस्तीच्या दुकानाजवळ तो इसम आला.. आणि "पायडल ठीक करण्यासाठी किती पैसे लागतील ?" त्याने एकदम व्याकुलातीने विचारले.."३० रुपये.." असा आवाज ऐकल्यावर क्षणार्धात त्याच्या मुलाचा चेहरा पडला..."बाबा, आज रात्री आपण चिकन नाही खाऊ शकणार ?" त्याच्या बाबांकडे प्रश्नांचे उत्तर नव्हते.. महिन्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्याच्या बाबांनी चिकन साठी जोडून ठेवलेले १०० रुपये पण सायकल ने त्यांच्या आनंदावर पाणी फिरवले होते . धाब्याचा बाजूला एक अशक्त माणूस पडलेला दिसला.लगबगीने त्याची एक छोटी मुलगी दुकानात आली आणि ४ रुपयाचा ब्रेड द्या असे म्हणू लागली.दुकानदार मुलीवर नाही म्हणून जोरात ओरडला. दयेपोटी मी न राहवून मुलीला ब्रेड विकत घेऊन दिला...मुलगी रडायला लागली.."माझे वडील भिकारी आहेत..दोन दिवसांपूर्वी मी आजारी पडले.. जवळ असलेल्या पैस्यातून त्यांनी माझासाठी औषधे आणली ..पण एक औषध ६० रुपयाचे होते...म्हणून वडील शनी मंदिराजवळ भिक मागायला गेले.. ते काल रात्री घरी परतले नाहीत.. आणि आज ते मला इथे अशा अवस्थेत भेटले ". शनी मंदिर आमच्या ऑफिस पासून १५ कि .मी. आहे..पोटात काहीही नसताना आमच्या ऑफिस पासून शनी मंदिर चा प्रवास.. विचार करूनही अंगावर काटा आला.. आज अशा गोष्टी का घडत होत्या माझा सोबत ? आयुष्य किती सहज , सोपं ,सुरळीत चाललं होत माझं.. संध्याकाळी घरी जाऊन कामवाली बाई येईल कि नाही..? माझी salary केव्हा वाढेल? घरामध्ये फुल फर्निचर केव्हा होईल.? या appriasal मध्ये ratings चांगली का नाही मिळाली? माझासाठी फक्त हेच प्रश्न होते.पण आज आयुष्य खूप वेगळ्या दृष्टीकोनातून बघावयास मिळाल. किंवा खूप जवळून म्हणा. गोष्ट १०० च रुपयांची.. पण प्रत्येकासाठी त्या १०० रुपयांचा किती वेगळा अर्थ होता.. कुणला त्याची गरजही नव्हती.. तर कुणासाठी तेच १०० रुपये म्हणजे सर्वस्व्स होते..त्या लहान मुलीचा आणि तिच्या वडिलांचा केविलवाणा चेहरा बघून माझे मन एकदम कळवळून गेले..माझाजवालाचे १०० रुपये काढून मी तिला दिले..मुलगी नको म्हणाली..वडिलांची शपथ दिल्यावर मुलीने पैसे घेतले. इतक्यात वेटर ने आवाज दिला ..म्याडम जेवण तयार आहे .१०० रुपये द्या. पुन्हा १०० रुपये...

गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

अम्मी..!!

ठाण्यात मी आणि धनश्री पेइंग गेस्ट म्हणून घर शोधण्याच्या मोहिमेत होतो. धनश्रीच्या भावाकडून एका आजींचा पत्ता आम्हाला मिळाला.. घर अगदी स्टेशन च्या जवळ.. आजूबाजूचा परिसर आणि जाण्या येण्याची सोय..यामुळे घर बघण्याआधीच आम्हाला घर आवडला होतं.. जिना चढून वर गेलो..दारावरची पाटी वाचली.."राजन अभ्यंकर" ..मनात म्हणलं कोकणस्थ वाटताहेत. ..बऱ्याच वेळा नंतर दरवाजा उघडला.. जवळपास ७५-८० वर्ष्याच्या आजीनी दरवाजा उघडला.. मनात टिपिकल कोकणस्थ आजींचे वर्णन रेखाटले होते अगदी तशीच प्रतिकृती डोळ्यासमोर उभी राहिली.. प्रस्सन हसरा चेहरा ... तरुण वयातल्या आम्हालाही लाजवेल अशी नितळ गोरीपान कांती...घारे डोळे...म्हातारपणाची निशाणी असलेला डोळ्यावर चष्मा..बघताना उच्चभ्रू घरतल्या वाटल्या.. आजीनी घरात बोलवून ओळख पाळख चे पूर्व सोपस्कार झाल्यावर त्यांच्या अटी आणि नियम सांगितले घरात राहण्यासाठी...मुंबईत आल्यापासून २ वर्ष आम्ही स्वतंत्र घर करून राहत आलो होतो.. कुणाच्या बंधनात आणि नियमात राहण्याची सवय जरा मोडली होती..आणि अज्जींची नियमाची यादी ऐकून पूर्वीच्या काळात मुली सासूचे जसे वर्णन करायच्या ..तशी कडक आणि खाष्ट सासू डोळ्यासमोर उभी राहिली..विचार करून २ दिवसात निरोप कळवतो म्हणून आम्ही दोघी जाण्याच्या तयारीत होतो.. "ठीके आहे बेटा पण २ दिवस म्हणजे मी २ दिवसच वाट बघेन ..नंतर लगेच दुसऱ्या मुली आहेत नाहीतर .." आजींचा सडेतोडपणा दिसला..जाता जाता "थांबा ग मुलीनो उन्हात आलात "म्हणून आजीनी त्यांच्या कोकणातला कोकम चा सरबत पिण्यास दिलं.."सावकाश जा ग उन्हाच फिरताहेत एकट्याच मुली .." म्हणून निरोप दिला आणि आम्ही घरी निघालो.. आजीना बघून वाटेत मला माझ्या आज्जीची आठवण झाली..घरापासून दूर राहिल्याने बाहेर मोठ्या माणसाने आपली काळजी केली कि किती छान वाटत.. घरी जाऊन दोघींनी विचार केला आणि ठरवला..आज्जींच्या घरी राहायचा.. लगेच अज्जीना फोन केला..आज्जी आमचा पक्का बरका रूम चा . "होका..पोरी पण मला आजी नाही अम्मी म्हणत जा..आणि बाकी पैसे वागिरे घाई करू नाकात..ऑफिस असतं ना ..राहायला याल तेव्हा दिले तरी चालतील..ठीक आहे वाट बघते मी या मग शनिवारी आणि रूम नाही घर म्हणा ..".आज्जींच बोलणं ऐकून मला परत सगळ्यात घरामध्ये राहायला गेल्यासारखं वाटल शनिवारी आमचा बोरा बिस्तर बांधून आम्ही अम्मी कडे गेलो..आम्ही येणार म्हणून अम्मिनी खीर करून ठेवली होती..स्वागत तर छान केला होतं आमच..सुरुवातीच्या काळात अम्मिंचे नियम अटी त्या चांगल्या जरी असल्या तरी ऑफिस ला जाण्याच्या घाईत ते सगळा पाळण म्हणजे नकोस वाटायच.. कित्येकदा त्या नादात बस चुकायची. ऑफिस मधून घरी यायला उशीर व्हायचा ..आणि आल्यावर थकून झोपू म्हणला कि अम्मिंचे हजार प्रश्न "का ग..ऑफिस मध्ये इतका कसा काम असतं ..ऑफिस मध्येच होतात हि बाहेर कुथे जाऊन आलात" असा प्रश्न आला कि मग चीड चीड होऊन वाटायचा कुठून आलो इथे राहायला..अम्मी तशा शिकलेल्या होत्या ..त्या काळात त्यांचा १० वी झालेलं..नौकरी केलेली.. मग असा कस बंधन घालतात अस वाटायचं एकदा माझे खूप पोट दुखत होतं..अम्मिनी रात्री उठून गरम पाणी ओवा करून दिलं.. सकाळी आईशी घरी बोलल्या काळजी करू नका...आता मृदुला एकटी नाहीये. एकदा ट्रेकिंग वरून वापस आले..अम्मिनी डोक्याला आणि पायाला छान मालिश करून दिलं.. सुट्टीच्या दिवशी आम्हाला आवडेल तो घरगुती नाश्ता आणि जेवण या सगळ्या आपलेपणामुळे नंतर मग अम्मिंच्या शिस्तीचीच सवय झाली ..वाटायचं..की वाईट तर सांगत नाहीयेत ना.... त्या दिवशी रात्री पासूनच त्यांना अस्वथ वाटत होतं.. ब्लड प्रेशर वाढला होतं.. सकाळी अम्मी ना अचानक पायात मुरगळ आली आणि अम्मी चक्कर येऊन खाली पडल्या .. जवळच्या डॉक्टर कडे घेऊन गेले..त्यांनी औषधे लिहून दिली..घरी आल्यावर त्यांनाही बरं वाटल..बोलता बोलता अम्मिंना विचारला अम्मी ..इतका वय तुमचा पण एकट्या का राहतात तुम्ही?..मुलगा आहे ना पुण्याला..जा त्यांच्याकडे ..आणि आरामात राहा..अम्मिना डोळ्यातला पाणी प्रयत्न करूनही अडवता आल नाही..म्हणाल्या मुलगा असूनही विचारात नाही..नवरा लहान वयातच गेला..एकुलता एक मुलगा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल त्याला.. त्याचं शिक्षणासाठी नाही नाही ती कामे मी केली.. नवऱ्याच्या जागी त्याला नौकरी दिली आणि मी स्वतः खाजगी नौकरी केली.. मुलगा मोठा झाला..स्वतःच्या आयुष्याचे निर्णय त्याने एकट्यानेच घेतले.. एकाही निर्णयात त्याने माझा सल्ला देखील घेतला नाही.. लग्न केलं ..स्वतःचा वेगळा संसार थाटला.. एकट्या आईचा एकदाही विचार त्याने नाही केला ..इतक्या वर्षानंतरही त्याने स्वतःहून एकदाही आई घरी चाल म्हणून बोलावले नाही..कि आई वय झालाय तुझा दुखतय का काही..औषध आणू का तुझ्यासाठी म्हणून विचारला नाही.. हि गोष्ट माझा मन नाही पचवू शकत पोरी .. माझा स्वाभिमान सोडून मी त्याच्या घरी जाऊन नाही राहू शकत ... आणि म्हणून मी तुमच्या सारख्या मुलीना पेइंग गेस्ट म्हणून ठेवते.. मला आता रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती ज्यांना आपुलकी आहे माझाबद्दल...ती खरी नाती वाटतात .. खूप लाडाने मुलाच नाव राजन ठेवल होतं वाटला होतं राज कुमारासारख वाढवलाय मुलाला राज मातेसारख जरी नाही तरी सरवा साधारण आई सारखा सांभाळेल..असो मी एकटी आहे पण समाधानी आहे .. मुलाच लग्न होईपर्यंत मुलगा आईचा असतो नंतर त्याच्या बायकोचाच..मुली मात्र आयुष्यभर आईवादिलांच्याच असतात ..वाटत एक राजन सारखी राजश्री असली असती मला तर तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती तुझ्यासारखी..नशीबवान आहे ग पोरी तुझी आई.. आता देवाकडे काही मागणं नाही ..खूप सोसलाय पोरी..लवकर मरण येवू दे..कुणाला माझा आजारपण नको काढू द्यायला हीच इच्छा आहे.. चालता बोलता मरण दे ..हेच मागते मी देवाकडे .. माझ्याही डोळ्यातून नकळत पाणी आले..मन हळवे झाले..आम्ही आहोत ना आम्मी तुम्ही काळजी नका करू म्हणून मी आम्मिना पेन किलर ची गोळी दिली..अम्मी झोपी गेल्या..माझा मनात विचार चक्र चालू जाहला..पोटची पोर पण इतकी कशी निष्टुर आणि स्वार्थी वागू शकतात..???!! असो...अशा हौशी, स्वाभिमानी, शिस्तप्रिय , कष्टाळू, स्वभावाने कठोर आणि कडक पण माने तितक्याच हळव्या आणि प्रेमळ आम्मी आयुष्यभर लक्षात राहतील...

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

असे संपले २०११!!!


नूतन वर्षानिम्मिता हार्दिक अभिनंदन!! ... असे मेल्स  आणि मेसेजेस यायला सुरुवात झाली की एकदम वर्ष संपल्याची जाणीव होते.. मग  सगळ्यांच्या एकंच प्रतिक्रिया ..
 "कसं गेले वर्ष कळालच नाही ...किती लवकर गेले हे वर्ष..!!" खरच कस गेलं २०११ कळलच नाही..
पहिली ३-४ महिने खूपच धावपळीची गेली.. ऑफिस मधील बरीच सिनियर मंडळी सोडून गेल्याने कामाच लोड आणि जिम्मेदारी बरीच वाढला होत..त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष्य द्यायला फारसा वेळ मिळत नव्हता.. आपण सगळेच आपला ध्येयामागे  इतके गुंग असतो क्की दिवस मोजणं लक्षात राहातच नाही.

या वर्षात बरेच भले बुरे अनुभव आले..काही गोष्टी न मागताही सहज मिळाल्या..काही चांगल्या गोष्टी अपेक्षा नसतानाही सहज मिळाल्या..तर काही गोष्टी ज्यांच्यासाठी खूप जीवापाड मेहनत केली होती त्या प्रयत्न करूनही नाही मिळाल्या....खूप नवीन मित्र -मैत्रिणी मिळाले...अनेक नवीन नाते जुडले..काही जुनी नाती पुन्हा नव्या रूपाने समोर आली...काही नाती कायमची तुटलीही...तसेच "चाहे जो तुम पुरे दिल से ..मिलता है वो मुश्कील से.या वाक्याचा परत एकदा खूप जवळून अनुभव आला...


असो,अशाच सगळ्या कडू गोड आठवणी घेऊन पुढच्या वर्षाच्या योजना करणे हेच तर आयुष्य..आणि यातच तर खरी मजा आहे..एखाद्याला हवं ते सगळच सहज मिळत गेलं तर आयुष्य किती बोर होऊन जाईल..मला तर असा वाटत आपण मागच्या वर्षीचे जितके क्षण, दिवस वर्षाच्या शेवटी आठवू शकतो ..मग ते चांगले असो किंवा वाईट..तेव्हडेच क्षण किंवा दिवस आपण खरया अर्थाने जगलेलो असतो..
म्हणून वाटतय या वर्षी प्रत्येक दिवस स्मरणात राहील असा करण्याचा प्रयत्न..कारण...झीन्दागी ना मिलेगी दोबारा!!!

सरत्या वर्षाच्या काही आठवणी..

Team award!!

Client Visit!!

Alibagg--ketakichya ghari!!

Dil chahata hai!!

Best Bday surprise--ever had!!

beach-birthday!!

Chaar chaughi!!

matheraan..!! Team building Trip!!

Performance Award!!

  

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

सहज सुचलं म्हणून..





लिखाणाची आणि वाचनाची आवड तशी लहानपणापासूनच.या आधीही या लिंक  वरचे बरेच ब्लोग्स वाचले.कित्येकदा वाचून खळखळून हसले , तर कधी सहज डोळ्यातून पाणी आले.किती वेळा ब्लोग वाचून विचार करण्यास भाग पडले तर कधी ब्लोग्स वाचून माझे विचार बदलले.वाटलं आपणही लिहावं...पण कंटाळा आणि सुट्टी मिळाली कि लिहू , हे झाल कि लिहू, कामच लोड कमी झाल कि लिहू.. या सगळ्या पुढे मनातले विचार मनातच राहिले.
काल एक मैल वाचला..सलील कुलकर्णी यांचे विचार होते त्यात ..."राहूनच गेले.." हि तैग वाचून हातातले काम सोडून मैल वाचण्यास घेतला. ..विचार ताशे नेहमीचेच होते..वेळ मिळाला कि करू, अमुक चांगली गोष्ट झाली कि करू, या सगळ्या गोष्टींमध्ये करायच्या गोष्टी तशाच राहून जातात..आणि ती वेळ गेल्यावर त्या गोष्टी करण्यातला आनंदही तसाच हरवून जातो..

विचार करता करता आठवला लहानपनि शाळेत असताना आई भाषणाच्या स्पर्धेत छान
भाषण लिहून द्यायची..आणि मी जाऊन मनात येतील ते विचार बोलून द्यायचे... मराठीच्या पेपर
 मध्ये निबंध छान लिहिण्याच्या नादात पेपर अर्धवट राहिला म्हणून बाईंचा खालेला ओरडा...किती सहज होता तेव्हा सगळा...काहीही न ठरवता..
मग ठरवला काहीही झाला तरी मनातले विचार आपणही लिहून बघावेत... खूप काही अवघड आणि वैचारिक नाही लिहू शकले तरी अगदी सहज जे वाटेल ते लिहिण्याचा प्रयत्न करीन..
या नवीन वस्र्शाचा माझा हा संकल्प समजा..बघू.. दरवर्षीच्या संकल्प[प्रमाणे हा केवळ संकल्प राहणार नाही असा प्रयत्न करीन..


सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्चा!!!!!!

पुढचा लेख: असे संपले २०११... कृपया वाचत राहा...!