गुरुवार, १९ एप्रिल, २०१२

अम्मी..!!

ठाण्यात मी आणि धनश्री पेइंग गेस्ट म्हणून घर शोधण्याच्या मोहिमेत होतो. धनश्रीच्या भावाकडून एका आजींचा पत्ता आम्हाला मिळाला.. घर अगदी स्टेशन च्या जवळ.. आजूबाजूचा परिसर आणि जाण्या येण्याची सोय..यामुळे घर बघण्याआधीच आम्हाला घर आवडला होतं.. जिना चढून वर गेलो..दारावरची पाटी वाचली.."राजन अभ्यंकर" ..मनात म्हणलं कोकणस्थ वाटताहेत. ..बऱ्याच वेळा नंतर दरवाजा उघडला.. जवळपास ७५-८० वर्ष्याच्या आजीनी दरवाजा उघडला.. मनात टिपिकल कोकणस्थ आजींचे वर्णन रेखाटले होते अगदी तशीच प्रतिकृती डोळ्यासमोर उभी राहिली.. प्रस्सन हसरा चेहरा ... तरुण वयातल्या आम्हालाही लाजवेल अशी नितळ गोरीपान कांती...घारे डोळे...म्हातारपणाची निशाणी असलेला डोळ्यावर चष्मा..बघताना उच्चभ्रू घरतल्या वाटल्या.. आजीनी घरात बोलवून ओळख पाळख चे पूर्व सोपस्कार झाल्यावर त्यांच्या अटी आणि नियम सांगितले घरात राहण्यासाठी...मुंबईत आल्यापासून २ वर्ष आम्ही स्वतंत्र घर करून राहत आलो होतो.. कुणाच्या बंधनात आणि नियमात राहण्याची सवय जरा मोडली होती..आणि अज्जींची नियमाची यादी ऐकून पूर्वीच्या काळात मुली सासूचे जसे वर्णन करायच्या ..तशी कडक आणि खाष्ट सासू डोळ्यासमोर उभी राहिली..विचार करून २ दिवसात निरोप कळवतो म्हणून आम्ही दोघी जाण्याच्या तयारीत होतो.. "ठीके आहे बेटा पण २ दिवस म्हणजे मी २ दिवसच वाट बघेन ..नंतर लगेच दुसऱ्या मुली आहेत नाहीतर .." आजींचा सडेतोडपणा दिसला..जाता जाता "थांबा ग मुलीनो उन्हात आलात "म्हणून आजीनी त्यांच्या कोकणातला कोकम चा सरबत पिण्यास दिलं.."सावकाश जा ग उन्हाच फिरताहेत एकट्याच मुली .." म्हणून निरोप दिला आणि आम्ही घरी निघालो.. आजीना बघून वाटेत मला माझ्या आज्जीची आठवण झाली..घरापासून दूर राहिल्याने बाहेर मोठ्या माणसाने आपली काळजी केली कि किती छान वाटत.. घरी जाऊन दोघींनी विचार केला आणि ठरवला..आज्जींच्या घरी राहायचा.. लगेच अज्जीना फोन केला..आज्जी आमचा पक्का बरका रूम चा . "होका..पोरी पण मला आजी नाही अम्मी म्हणत जा..आणि बाकी पैसे वागिरे घाई करू नाकात..ऑफिस असतं ना ..राहायला याल तेव्हा दिले तरी चालतील..ठीक आहे वाट बघते मी या मग शनिवारी आणि रूम नाही घर म्हणा ..".आज्जींच बोलणं ऐकून मला परत सगळ्यात घरामध्ये राहायला गेल्यासारखं वाटल शनिवारी आमचा बोरा बिस्तर बांधून आम्ही अम्मी कडे गेलो..आम्ही येणार म्हणून अम्मिनी खीर करून ठेवली होती..स्वागत तर छान केला होतं आमच..सुरुवातीच्या काळात अम्मिंचे नियम अटी त्या चांगल्या जरी असल्या तरी ऑफिस ला जाण्याच्या घाईत ते सगळा पाळण म्हणजे नकोस वाटायच.. कित्येकदा त्या नादात बस चुकायची. ऑफिस मधून घरी यायला उशीर व्हायचा ..आणि आल्यावर थकून झोपू म्हणला कि अम्मिंचे हजार प्रश्न "का ग..ऑफिस मध्ये इतका कसा काम असतं ..ऑफिस मध्येच होतात हि बाहेर कुथे जाऊन आलात" असा प्रश्न आला कि मग चीड चीड होऊन वाटायचा कुठून आलो इथे राहायला..अम्मी तशा शिकलेल्या होत्या ..त्या काळात त्यांचा १० वी झालेलं..नौकरी केलेली.. मग असा कस बंधन घालतात अस वाटायचं एकदा माझे खूप पोट दुखत होतं..अम्मिनी रात्री उठून गरम पाणी ओवा करून दिलं.. सकाळी आईशी घरी बोलल्या काळजी करू नका...आता मृदुला एकटी नाहीये. एकदा ट्रेकिंग वरून वापस आले..अम्मिनी डोक्याला आणि पायाला छान मालिश करून दिलं.. सुट्टीच्या दिवशी आम्हाला आवडेल तो घरगुती नाश्ता आणि जेवण या सगळ्या आपलेपणामुळे नंतर मग अम्मिंच्या शिस्तीचीच सवय झाली ..वाटायचं..की वाईट तर सांगत नाहीयेत ना.... त्या दिवशी रात्री पासूनच त्यांना अस्वथ वाटत होतं.. ब्लड प्रेशर वाढला होतं.. सकाळी अम्मी ना अचानक पायात मुरगळ आली आणि अम्मी चक्कर येऊन खाली पडल्या .. जवळच्या डॉक्टर कडे घेऊन गेले..त्यांनी औषधे लिहून दिली..घरी आल्यावर त्यांनाही बरं वाटल..बोलता बोलता अम्मिंना विचारला अम्मी ..इतका वय तुमचा पण एकट्या का राहतात तुम्ही?..मुलगा आहे ना पुण्याला..जा त्यांच्याकडे ..आणि आरामात राहा..अम्मिना डोळ्यातला पाणी प्रयत्न करूनही अडवता आल नाही..म्हणाल्या मुलगा असूनही विचारात नाही..नवरा लहान वयातच गेला..एकुलता एक मुलगा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपल त्याला.. त्याचं शिक्षणासाठी नाही नाही ती कामे मी केली.. नवऱ्याच्या जागी त्याला नौकरी दिली आणि मी स्वतः खाजगी नौकरी केली.. मुलगा मोठा झाला..स्वतःच्या आयुष्याचे निर्णय त्याने एकट्यानेच घेतले.. एकाही निर्णयात त्याने माझा सल्ला देखील घेतला नाही.. लग्न केलं ..स्वतःचा वेगळा संसार थाटला.. एकट्या आईचा एकदाही विचार त्याने नाही केला ..इतक्या वर्षानंतरही त्याने स्वतःहून एकदाही आई घरी चाल म्हणून बोलावले नाही..कि आई वय झालाय तुझा दुखतय का काही..औषध आणू का तुझ्यासाठी म्हणून विचारला नाही.. हि गोष्ट माझा मन नाही पचवू शकत पोरी .. माझा स्वाभिमान सोडून मी त्याच्या घरी जाऊन नाही राहू शकत ... आणि म्हणून मी तुमच्या सारख्या मुलीना पेइंग गेस्ट म्हणून ठेवते.. मला आता रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली नाती ज्यांना आपुलकी आहे माझाबद्दल...ती खरी नाती वाटतात .. खूप लाडाने मुलाच नाव राजन ठेवल होतं वाटला होतं राज कुमारासारख वाढवलाय मुलाला राज मातेसारख जरी नाही तरी सरवा साधारण आई सारखा सांभाळेल..असो मी एकटी आहे पण समाधानी आहे .. मुलाच लग्न होईपर्यंत मुलगा आईचा असतो नंतर त्याच्या बायकोचाच..मुली मात्र आयुष्यभर आईवादिलांच्याच असतात ..वाटत एक राजन सारखी राजश्री असली असती मला तर तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती तुझ्यासारखी..नशीबवान आहे ग पोरी तुझी आई.. आता देवाकडे काही मागणं नाही ..खूप सोसलाय पोरी..लवकर मरण येवू दे..कुणाला माझा आजारपण नको काढू द्यायला हीच इच्छा आहे.. चालता बोलता मरण दे ..हेच मागते मी देवाकडे .. माझ्याही डोळ्यातून नकळत पाणी आले..मन हळवे झाले..आम्ही आहोत ना आम्मी तुम्ही काळजी नका करू म्हणून मी आम्मिना पेन किलर ची गोळी दिली..अम्मी झोपी गेल्या..माझा मनात विचार चक्र चालू जाहला..पोटची पोर पण इतकी कशी निष्टुर आणि स्वार्थी वागू शकतात..???!! असो...अशा हौशी, स्वाभिमानी, शिस्तप्रिय , कष्टाळू, स्वभावाने कठोर आणि कडक पण माने तितक्याच हळव्या आणि प्रेमळ आम्मी आयुष्यभर लक्षात राहतील...

३ टिप्पण्या: